पहिली बायोटेक स्टार्टअप एक्स्पो पंतप्रधानांच्या हस्ते सुरू

पहिली बायोटेक स्टार्टअप एक्स्पो पंतप्रधानांच्या हस्ते सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार,९ जून रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील पहिल्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो २०२२ चे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. गेल्या आठ वर्षांत भारताची जैव-अर्थव्यवस्था आठ पटीने वाढली असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, बायोटेक स्टार्ट-अप एक्स्पो हा भारताच्या बायोटेक क्षेत्राच्या वाढीचे प्रतिबिंब आहे. गेल्या आठ वर्षात भारताची जैव-अर्थव्यवस्था आठ पटीने वाढली आहे, या क्षेत्रात आपली अर्थव्यवस्था १० बिलियन डॉलर वरून तब्बल ८० बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. आयटी व्यावसायिकांच्या कौशल्यमुळे हे शक्य झाले आणि आयटी व्यावसायिकांनी भारताला एका नव्या उंचीवर नेले आहे.

हे ही वाचा:

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली

सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या आठ वर्षांत आपल्या देशातील स्टार्ट-अपची संख्या ७० हजारांवर पोहोचली आहे. हे ७० हजार स्टार्टअप्स सुमारे ६० वेगवेगळ्या उद्योगांमध्ये बनवले गेले आहेत. यामध्ये पाच हजाराहून अधिक स्टार्ट अप्स बायोटेकशी संबंधित आहेत. अटल इनोव्हेशन मिशन, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत गेल्या काही वर्षांत उचललेल्या पावलांचा बायोटेक क्षेत्रालाही फायदा झाला आहे. स्टार्टअप इंडिया सुरू झाल्यापासून आमच्या बायोटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या नऊ पटीने वाढली असल्याची माहिती पंतप्रधांनांनी दिली आहे.

Exit mobile version