28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींनी दिला पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान मोदींनी दिला पाकिस्तानला इशारा

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक महासभेत बोलताना आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. आतंकवादाच्या मुद्द्यावर भाष्य करत असताना मोदींनी पाकला इशारा दिला आहे. ‘जे देश दहशतवादाचा पोलिटिकल टूल म्हणून उपयोग करतात त्यांनी हे समजले पाहिजे की दहशतवाद हा त्यांच्यासाठी ही धोकादायक आहे’ असे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी कुठेही पाकिस्तानचे थेट नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख हा पाकिस्तानकडेच होता असे मानले जात आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाची ७६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न होत आहे. शनिवार, २५ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवरची भारताची भूमिका मांडली. तर त्यासोबतच विविध क्षेत्रात भारताने केलेली उल्लेखनीय कामगिरी ही जगासमोर ठेवली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?

योगी सरकारची लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

भारताची प्रगती होते तेव्हाच जगाच्या विकासाला गती मिळते

दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी सध्या अफगाणिस्तान येथे सुरू असलेल्या बाबींवरही आपले मत मांडले. जे देश आतंकवादाचा उपयोग पॉलिटिकल टूलच्या स्वरूपात करतात त्यांनी ही गोष्ट समजली पाहिजे की आतंकवाद त्यांच्यासाठीही तितकाच धोकादायक आहे. अफगणिस्तानच्या बाबत आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होणार नाही. यावेळी अफगाणिस्तानमधील महिला आणि बालकांना मदतीची आवश्यकता आहे. आपल्याला आपले दायित्व पार पाडावे लागेल. अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांकांची सुरक्षा ही देखील महत्त्वाची आहे.

त्या सोबतच सागरी सीमांचाही दुरुपयोग होऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल असे मोदी यांनी म्हटले. दहशतवादाचा उपयोग हत्यारासारखा चेला जाऊ नये. अफगाण, शिख, हिंदू नागरिकांची सुरक्षा गरजेची आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आवाज उठवायला हवा. जगातील अनेक भागात प्रॉक्सी युद्ध सुरू आहे. या साऱ्यात संयुक्त राष्ट्र संघाची जबाबदारी वाढली आहे असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तर संयुक्त राष्ट्रसंघाने आपली विश्वासार्हताही वाढवावी लागेल असे परखड मत मोदींनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा