पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी संवाद साधला. व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा संवाद साधला गेला. ही वेळ केवळ आव्हानांवर मात करण्याची नाही तर अत्यंत कमी कालावधीत तोडगा उपलब्ध करून देण्याची आहे असे मत या बैठकीत मोदींनी व्यक्त केले. तसेच सरकार आणि उत्पादक यांच्यात समन्वय असणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
देशात सध्या कोरोनाच हाहाकार माजला आहे. रोज लाखो लोक या महामारीच्या कचाट्यात सापडत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी संवाद साधला.
हे ही वाचा:
ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून
…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल
पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!
हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी
यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्पादकांकडून ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले त्यांनी जाणून घेतली. तर सरकार ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करत असलेल्या कार्याची माहितीही दिली. औद्योगिक क्षेत्रातील वापर थांबवून सर्व ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रात वापरला जात असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार, उद्योग क्षेत्र वाहतूकदार आणि सर्व रुग्णालयांनी एकत्र येऊन एकत्र काम करण्याची गरज आहे. ताळमेळ आणि समन्वय चांगला राहिल्यास आव्हानावर मात करणे सोपे जाईल असे मत मोदींनी व्यक्त केले.
आरआयएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकेश अंबानी, एसएआयएल च्या अध्यक्षा श्रीमती सोमा मंडल , जेएसडब्लूचे श्री सज्जन जिंदाल , टाटा स्टीलचे नरेंद्रन, जेएसपीएल चे श्री . नवीन जिंदाल, एएमएनएसचे श्री. दिलीप ओमेन, एलआयएनडी चे श्री. एम . बॅनर्जी, आयनॉक्सचे श्री, सिद्धार्थ जैन, एअर वॉटर जमशेदपूरचे व्यवस्थापकीय संचालक श्री . नोरियो शिबुया, नॅशनल ऑक्सीजन लिमिटेडचे श्री. राजेशकुमार सराफ आणि अखिल भारतीय औद्योगिक वायू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री. संकेत टिकू या बैठकीला उपस्थित होते.