खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!

पंतप्रधान मोदी यांनी शीख आणि शीख धर्मासाठी खूप काही केले

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान आहे असे विधान दल खालसाचे संस्थापक आणि माजी खलिस्तान समर्थक नेते जसवंत सिंह ठेकेदार यांनी केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जसवंत सिंग ठेकेदार यांनी हे विधान केले आहे.

जसवंत सिंह ठेकेदार मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले, पाकिस्तानला माहित आहे की जर खलिस्तान तयार झाला तर खलिस्तानवाद्यांचे पुढील लक्ष्य लाहोर असेल. त्यामुळे पाकिस्तान हे होऊ देणार नाही. खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान आहे. आयएसआय अमृतपाल सिंगचा वापर एक साधन म्हणून करत असल्याचा गंभीर आरोप जसवंत सिंह यांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयवर केला आहे. ठेकेदार यांनी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधानांनी शीख धर्मासाठी खूप काही केले

मुलाखतीमध्ये ठेकेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शीख आणि शीख धर्मासाठी खूप काही केले असल्याचे मत जसवंत सिंगठेकेदार यांनी यांनी व्यक्त केले आहे. ठेकेदार म्हणाले की , पंतप्रधान मोदींना शीख समुदायाबद्दल खूप आदर आहे आणि त्यांनी तेथील लोकांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. करतारपूर कॉरिडॉर उघडला, लोकांमध्ये छोट्या साहिबजादाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि लोकांना काळ्या यादीत टाकणे थांबवले. मोदी सरकारने अनेक मोठ्या मागण्या मान्य केल्या असून आणखी काही मागण्यांवर विचार करण्यात येणार असल्याचं ठेकेदार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

सरकारने खलिस्तानी नेत्यांच्या मागण्या मान्य केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल, असे जसवंत सिंह यांनी सांगितले. जसवंत सिंह म्हणाले की, शीख राजकीय कैद्यांची सुटका करणे, कलम २५ ब -२ मधून शिखांना हटवणे यासारख्या मागण्या मान्य केल्याने खलिस्तान चळवळ आपोआप कमकुवत होईल. यासोबतच सरकारने मागण्या मान्य केल्यास देशाचेही नुकसान होणार नाही अशी ते म्हणाले.

Exit mobile version