५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला मोदी सरकारची मंजुरी

५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला मोदी सरकारची मंजुरी

पीएम केअर्स फंडातून दिला जाणार निधी

कोविडच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात ५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायचा निर्णय घेतला आहे. देशभरात प्रत्येक जिल्ह्यात हे ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारले जाणार आहेत.

देशभर सध्या कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण ऑक्सिजनचा आवश्यक तितका पुरवठा होताना मात्र दिसत नाहीये. ऑक्सिजनचा हा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशात विविध ठिकाणी ऑक्सिजन एक्सप्रेस पाठवण्यात आली आहे. तर औद्योगिक वापरासाठीच ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी वापरला जात आहे.

हे ही वाचा:

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

रविवार, २५ एप्रिल रोजी मोदी सरकारकडून निर्णय घेत देशातील सर्व म्हणजे ५५१ जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पीएम केअर्सच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात हा प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. लवकरात लवकर हे प्लॅन्ट उभारून कार्यन्वयीत करण्यात यावेत असे पंतप्रधानांकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून जानेवारी महिन्यातच ‘पीएम केअर्स’ च्या माध्यमातून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी २०१.५८ कोटी रुपयांचा निधी हा सर्व राज्यांना मिळून देण्यात आला आहे.

Exit mobile version