22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाभारतात क्रूझ पर्यटनाला चालना मिळेल

भारतात क्रूझ पर्यटनाला चालना मिळेल

पंतप्रधानांनी केली क्रूझ पर्यटनाबाबत मोठी घोषणा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीपासून आसाममधील दिब्रुगडपर्यंत जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूझ ‘ एमव्ही गंगा विलासला’ झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधानांनी बटण दाबून टेंट सिटीचे उद्घाटनही केले. कार्यक्रमातच पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इतर अनेक आंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये हल्दिया येथील मल्टी मॉडेल टर्मिनलच्या उद्घाटनाचाही समावेश होता.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गंगा नदी ही आपल्यासाठी फक्त एक प्रवाह नाही. गंगा ही भारताच्या तपश्चर्येचीही साक्षीदार आहे. भारताची परिस्थिती काहीही असो, माँ गंगा यांनी नेहमीच करोडो भारतीयांचे पालनपोषण केले आहे आणि आपल्याला प्रेरणा दिली आहे.ही क्रूझ जिथून जाईल तिथून विकासाची नवीन रेषा जगाच्या नकाशावर तयार होईल. शहरांमधील लांब नदीवरील क्रूझ प्रवासाव्यतिरिक्त, आम्ही छोट्या क्रूझ च्या प्रवासाला देखील प्रोत्साहन देऊ.

आज काशी आणि दिब्रुगड दरम्यान जगातील सर्वात लांब क्रूझ गंगा विलास क्रूझ आज सुरू झाली आहे. या क्रूझवरील परदेशी पर्यटक त्यांच्या साथीदारांमध्ये भारताचा प्रसार करतील असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या भारत देशाची व्याख्या शब्दात करता येणार नाही.क्रूझवर बसलेल्या पर्यटकांना भारतातील धर्म, कला, संस्कृती, पर्यावरण, नद्या आणि उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

नदीचे जलमार्ग हेच बनतील भारताची नवी ताकद
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गंगा विलास क्रूझ जिथे जाईल तिथे जलपर्यटन होईल आणि तिथे विकासाची नवी रेषा तयार करेल. शहरांमधील लांब नदीवरील क्रूझ प्रवासाव्यतिरिक्त, आम्ही छोट्या अंतरावरील क्रूझला देखील प्रोत्साहन देऊ असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. त्यासाठी देशात सर्व प्रकारच्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. नदीचे जलमार्ग हे आता भारताची नवी ताकद बनतील, असे पंतप्रधान म्हणाले. गंगा विलास क्रूझची सुरुवात ही काही सामान्य गोष्ट नाही.

२४ राज्यांमध्ये  १११ जलमार्ग विकसित करण्याचे काम

३२०० किलोमीटरहून अधिकचा हा प्रवास भारतातील अंतर्देशीय जलमार्गाच्या विकासाचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. २०१४ पूर्वी देशात जलमार्गाचा फारसा वापर होत नव्हता. भारतात जलमार्गाचा प्राचीन इतिहास असताना ही परिस्थिती होती. २०१४ नंतर देशातील प्रमुख नद्यांमधील जलमार्गाच्या विकासासाठी आम्ही कायदे केले. २०१४ मध्ये देशात पाच राष्ट्रीय जलमार्ग होते. आज,२४ राज्यांमध्ये एकूण १११जलमार्ग विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा