भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल सात कोटींची कमाई केली आहे. पण ही कमाई म्हणजे कोणती आर्थिक स्वरूपाची नसून ट्विटर या सोशल साईटवरच्या फॉलोअर्सची आहे. या कमाईसह पंतप्रधान मोदी हे जगातले सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००९ साली ट्विटरवर सक्रिय झाले. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहत होते. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल १२ वर्षात मोदींनी आपला हा ट्विटर परिवार चांगलाच वाढवला. गुरुवार, २९ जुलै रोजी पंतप्रधानांच्या ट्विटर फॉलोअर्स आकडा हा सात कोटीच्या पुढे गेला आहे. एवढे जास्त फॉलोवर्स असलेले ते जगातील पहिलेच राजकीय नेते ठरले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२० सालच्या जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी ६ कोटी ट्विटर फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर तब्बल एका वर्षात मोदींच्या फॉलोअर्समध्ये १ कोटींची वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’
पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा
‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार
सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील काही टेक्नोसॅव्ही नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तर त्यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये ते जगातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते म्हणूनही उदयास आले आहेत. सोशल मीडिया हे माध्यम जेव्हा नवे नवे रुजू होत होते तेव्हापासूनच नरेंद्र मोदी हे त्यावर सक्रिय झाले. तर या नव्या माध्यमाचा राजकारणाच्या दृष्टीने प्रभावीपणे वापर करण्यातही ते यशस्वी झाले. आजही पंतप्रधान मोदी हे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, अशा सर्व प्रकारच्या लोकप्रिय सोशल साईट्सवर सक्रिय असतात.