24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारणवकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

Google News Follow

Related

‘निहित स्वार्थ असलेला एक गट’ न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा आणि न्यायालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्र सुमारे ६०० वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

‘इतरांना धमकावणे व गुंडगिरी करणे ही काँग्रेसची पुरातन संस्कृती आहे. पाच दशकांपूर्वी त्यांनी प्रतिबद्ध न्यायपालिकेसाठी आवाहन केले होते. स्वतःच्या स्वार्थी हितांसाठी ते निर्लज्जपणे इतरांकडून बांधिलकीची अपेक्षा ठेवतात. मात्र देशासाठी कुठलीही बांधिलकी ठेवण्यापासून ते अलिप्त राहतात. त्यामुळे १४० कोटी भारतीय त्यांना नाकारत आहेत, यात काही आश्चर्य नाही,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

मोदी यांच्या या टीकेनंतर काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीला धक्का देण्याची आणि राज्यघटनेला दुखवण्याची चांगली कला अवगत आहे, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वर मोदी सरकारच्या काळात न्यायव्यवस्थेत उद्भवलेल्या समस्यांचा पाढा वाचला.

‘न्यायव्यवस्थेचा बचाव करण्याच्या नादात पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेली टीका म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचाच एक निर्णय नुकताच रद्दबातल गेला आहे. निवडणूक रोखे हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सर्वोच्च न्यायालयाने हे घटनाविरोधी संबोधले होते. कंपन्यांना भाजपला देणगी देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपने भीती दाखवणे, ब्लॅकमेल आणि धमकावण्याचे एक उघड साधन म्हणून त्याचा वापर केला, हे आता सिद्ध झाले आहे,’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. ‘शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमती’ची हमी देण्याऐवजी ते भ्रष्टाचाराची हमी देत आहेत. गेल्या १० वर्षांत पंतप्रधानांनी केवळ दुही माजवणे, काही गोष्टी मोडतोड करून लोकांसमोर मांडणे, लोकांचे लक्ष विचलित करणे आणि अन्य लोकांना बदनाम करण्याचेच काम केले आहे. १४० कोटी नागरिक लवकरच त्यांना प्रत्युत्तर देतील,’ असेही रमेश यांनी नमूद केले.

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांच्यासह ६००हून अधिक ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिलेल्या या पत्रात न्यायालयीन अंखडता कमकुवत केला जात असल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

पवारांचे फासे उताणे पडतायत…

‘आम्ही कायदा टिकवून ठेवण्याचे काम करणारी माणसे आहोत. न्यायालयाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असा आमचा विश्वास आहे. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्यांविरोधात आता एकत्र येऊन बोलण्याची वेळ आली आहे. न्यायालये लोकशाहीचे आधारस्तंभ राहतील, याची आपण काळजी घेतली पाहिजे,’ असे या पत्रात म्हटले आहे. ‘एक विशिष्ट गट आपल्या बिनबुडाच्या राजकीय अजेंड्याच्या भाग म्हणून निराधार आरोप करून न्यायालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे,’ असेही यात नमूद करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा