वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर्सनी घेतली टी-शर्टवर पंतप्रधानांची स्वाक्षरी

वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर्सनी घेतली टी-शर्टवर पंतप्रधानांची स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार,१ जून रोजी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाऱ्या महिलांची भेट घेतली आहे. निखत झरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा या तीन महिला बॉक्सरची भेट पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यावेळी पंतप्रधानांनी या तिघींशी बराच वेळ चर्चा केली. निखतने तिच्या ट्विटर अकाऊंटवर फोटोही शेअर केला आहे. यावेळी या तिघींनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेतला आणि टी-शर्टवर ऑटोग्राफही घेतला आहे.

इस्तंबूल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ५२ वजनी गटात सुवर्ण जिंकणारी निखत जरीन, हरियाणाची बॉक्सर मनीषा मौन आणि ५७ व ६३ वजनी गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या परवीन हुडा यांना पंतप्रधानांनी निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यानुसार बुधवारी या तिघींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

निखतने आपले सुवर्णपदक पंतप्रधानांना दाखवले. हातात पदक घेऊन तिने पंतप्रधानांसोबत सेल्फीही काढला. पंतप्रधानांनी तिन्ही बॉक्सर्सच्या टी-शर्टवर त्यांचा ऑटोग्राफही दिला. निखतने ट्विट करत पंतप्रधानांना भेटल्याबद्दल आभार मानले आहेत. निखतने पंतप्रधानांसोबतचा फोटोही शेअर केला आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधानांना भेटून मला अभिमान वाटतो, असे मनीषाने ट्विटमध्ये म्हटले आहे. या भेटीसाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत.

हे ही वाचा:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

RBI ची ‘सोन’ पावलं !

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार

ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना

पंतप्रधानांनी बॉक्सर मुलींशी संवाद साधून देशाचे नाव उंचावणाऱ्या पदक विजेत्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी थॉमस कप जिंकणाऱ्या संघाचे बँकॉकमध्येच फोन करून अभिनंदन केले होते. यानंतर त्यांनी संपूर्ण टीमला आपल्या निवासस्थानी बोलावले होते.

Exit mobile version