विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी केले योगींचे अभिनंदन!

विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी केले योगींचे अभिनंदन!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत उत्तर प्रदेशातील आगामी सरकार स्थापनेबाबत आणि अनेक महत्त्वाच्या धोरणांवरही पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यात चर्चा झाली आहे. ही बैठक सुमारे दोन चालली अशी माहिती समोर येत आहे.

या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.  ट्विटमध्ये पंतप्रधान यांनी सीएम योगी यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ” आज योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन  गेल्या ५ वर्षात त्यांनी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. येत्या काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या आणखी उंचीवर नेतील, अशी मला खात्री आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि भाजपचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांचीही दिल्लीत भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. योगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट योगीजी घटणार आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेण्याच्या तयारीत योगी आहेत. या दरम्यान सरकार स्थापनेच्या संबंधित मुद्द्यांवर अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी योगीजी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

हे ही वाचा:

त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला, खासगी क्लासेसच्या शिक्षकाला अटक

नुकत्याच झालेल्या युपीच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने तब्बल २५५ जागा जिंकल्या आहेत. आणि भाजपाच्या दोन मित्रपक्षांनी १८ जागा जिंकल्या आहेत.

Exit mobile version