पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुंबई समाचार’च्या द्विशताब्दीला काढले उद्गार
‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोनशे वर्ष पूर्ण मुंबई समाचाराची दोनशे वर्षे पूर्ण झाली म्हणून अभिनंदन केले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रथम गुजरातीमध्ये संवाद साधला आहे. या वृत्तपत्राच्या भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी, त्याचा संपूर्ण भारतावर प्रभाव आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जमान्यात अशा गोष्टी समोर आल्यावर मुंबई समाचारच्या दोनशे वर्षे पूर्ण करण्याचे महत्व कळत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, मुंबई समाचारच्या पत्रकारितेला दोनशे वर्ष पूर्ण होण्याचा याच वर्षी योग्य आला आहे. कारण या वर्षी आपण स्वातंत्र्यच अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा क्षण देशातील पत्रकारितेचा शोभा वाढवणारा दिवस आहे. भारत देश वेळेबरोबर बदलत गेला मात्र आपली मूळ तत्व कधीच बदलली नाहीत. प्रत्येक काळाच्या नव्या बदलांना या वृत्तपत्राने जपले आहे. मुंबई समाचार हे वृत्तपत्र जेव्हा देशात सुरु झाले तेव्हा गुलामी वाढली होती. त्या काळात हे वृत्तपत्र सुरु करणे ही सोपी गोष्ट नसल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी या वृत्तपत्राचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’
संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार
वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका
प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मराठी आणि गुजरातीचं नात आणखी दृढ व्हावं अशी आशा व्यक्त केली आहे. गुजराती आणि मराठी दुधात साखर विरघळल्यासारखी आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.