पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचाराकरिता आज बुधवारी (१७ एप्रिल) आसाममधील नलबारी येथे पोहोचले.यावेळी पंतप्रधानांनी निवडणूक रॅलीला संबोधित केले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, एनडीएच्या सरकारच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. ४ जून रोजी एनडीए ४०० हून अधिक जागांसह विजयी होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज रामनवमीचा ऐतिहासिक सण आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांनंतर अयोध्येतील पवित्र नगरीतील राम मंदिरात सूर्य टिळक लावून भगवान रामाची जयंती सारी केली जाणार आहे. माता कामाख्या आणि माता काली यांना मी प्रणाम करतो.या ठिकाणी जमलेली प्रचंड गर्दी पाहून मला खूप आनंद होत आहे.
हे ही वाचा..
अयोध्येत प्रभू रामलल्लांवर ‘सूर्य तिलक’ अभिषेक
युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान
राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!
जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करताना ते पुढे म्हणाले, ४ जूनला निकाल काय लागणार हे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच लोक म्हणतात- ४ जून ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.ते पुढे म्हणाले, भाजप अशी पार्टी आहे, जी सबका साथ, सबका विकास या मंत्रावर चालते.एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कोणताही भेदभाव नाही, प्रत्येकाला त्याचा लाभ मिळतो. आता एनडीएने निर्णय घेतला आहे की देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून, ज्या सुविधेसाठी ते पात्र आहेत, त्यांना त्या देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, २०१४ मध्ये मोदींनी तुमच्यामध्ये एक आशा आणली होती.२०१९ मध्ये मोदींनी तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणला होता.२०२४ मध्ये मोदी तुमच्यासाठी गँरंटी घेऊन आले आहेत .पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोदींची गँरंटी म्हणजे पूर्ण होण्याची गँरंटी आहे.आज संपूर्ण देशात मोदींची गँरंटी चालत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.