पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे नवा इतिहास निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाने तीन प्रतिज्ञा घेतल्या पाहिजेत. स्वच्छता, सृजनशीलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी वचनबद्धता यांचा त्यांनी उल्लेख केला.
आमच्या कारागिरांचे, आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधित लोकांचे, प्रशासनातील लोकांचे, ज्यांची येथे घरे आहेत त्या कुटुंबांचे मी अभिनंदन करतो. या सर्वांसोबतच, मी यूपी सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी काशी विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक केले आहेत. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
काशीत प्रवेश करताच सर्व बंधनातून मुक्त होतो असे आपल्या पुराणात सांगितले आहे. भगवान विश्वेश्वराचे आशीर्वाद, एक अलौकिक उर्जा आपण येथे येताच आपल्या अंतर्यामाला जागृत करतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
इथे आल्यावर फक्त श्रद्धा दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील वैभवही इथे जाणवेल. पुरातनता आणि नवीनता एकत्र कसे जिवंत होतात. प्राचीन काळातील प्रेरणा भविष्याला कशी दिशा देत आहे, आम्ही त्याचे थेट दर्शन विश्वनाथ धाम संकुलात करत आहोत. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
#WATCH | Varanasi: After inaugurating Kashi Vishwanath Corridor, PM Narendra Modi starts his address with the chant of 'Har Har Mahadev'
(Source: DD) pic.twitter.com/JlrDIF9adC
— ANI UP (@ANINewsUP) December 13, 2021
काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर जो केवळ ३,००० चौरस फुटांचा होता, तो आता जवळपास ५ लाख चौरस फुटांचा झाला आहे. आता, ५० ते ७५ हजार भाविक मंदिर आणि त्याच्या परिसराला भेट देऊ शकतात. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नव्या भारताला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आपल्या क्षमतेवरही विश्वास आहे. नव्या भारतात ‘विरासत’ आणि ‘विकास’ आहे. असे पंतप्रधान मोदी वाराणसी येथे म्हणाले.
हे ही वाचा:
प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण
नाफ्ताली बेनेट यांचा ऐतिहासिक युएई दौरा
येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही
तत्पूर्वी, त्यांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले आणि प्रार्थना केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. गंगेत डुबकी मारण्यासाठी आणि मंदिरात पवित्र नदीचे पाणी अर्पण करण्यासाठी गर्दीच्या रस्त्यावरून जावे लागलेल्या यात्रेकरूंसाठी सहज प्रवेशयोग्य मार्ग तयार करण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली होती.