‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात

मोदींना पराभूत करण्याच्या विरोधकांच्या आकांक्षांना सुरुंग

‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात

भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईला होत असताना त्यांना धडकी भरवणारे पोस्टर भाजपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘टर्मिनेटर’ म्हणून संबोधण्यात आले असून, त्यात ‘(आय विल बी बॅक) मी पुन्हा येईन’, असे वाक्यही लिहिले आहे.

‘द टर्मिनेटर’ हा हॉलिवूडचा अत्यंत लोकप्रिय चित्रपट असून या चित्रपटातील मुख्य पात्राच्या रूपात नरेंद्र मोदी यांना रेखाटण्यात आले आहे. तसेच, या चित्रपटाची लोकप्रिय ‘टॅगलाइन’ पोस्टरवर वापरण्यात आली आहे. हे वाक्य लिहून विरोधी आघाडी कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पराभूत करू शकणार नाही, असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सन २०२४मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील, असेही त्यांनी याद्वारे सूचित केले आहे.

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा गट ‘इंडिया’ची बैठक होत असतानाच ३० ऑगस्ट रोजी भाजपतर्फे हे पोस्टर प्रसिद्ध करून विरोधी पक्षांना इशारा देण्यात आला आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत खात्यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टरसोबत पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याच्या विरोधकांच्या आकांक्षांनाही सुरुंग लावला आहे . ‘विरोधकांना वाटते की, पंतप्रधान मोदींचा पराभव होऊ शकतो. स्वप्न पहा! टर्मिनेटर नेहमी जिंकतो,’ असे यात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात

जोहान्सबर्गमधील इमारतीत अग्नितांडव; ६३ जणांचा मृत्यू

८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!

आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न

२६ विरोधी पक्षांची युती असलेल्या ‘इंडिया’ गटाची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. सन २०२४ लोकसभेसाठी त्यांची रणनीती मजबूत करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक समन्वय समितीची निवड आणि युतीचा लोगो यांसह महत्त्वाच्या घोषणा यावेळी अपेक्षित आहेत. या बैठकीत देशभरातील संयुक्त आंदोलनांचे नियोजन आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाची रणनीतीही आखली जाणार आहे. विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे.

Exit mobile version