पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा ‘पहले मतदान, फिर जलपान’ असा नारा दिला आहे. सकाळी ट्विट करत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमधील नागरिकांना हे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आजपासून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण ५८ विधानसभा क्षेत्रांसाठी मतदान पार पडणार आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडत असून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करत लोकशाहीच्या या पावन पर्वामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव में आज पहले चरण की वोटिंग है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड नियमों का पालन करते हुए लोकतंत्र के इस पावन पर्व में बढ़-चढ़कर हिस्सा लें। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2022
हे ही वाचा:
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’
थंडीमुळे मतदानाला थंड सुरुवात!
आज उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा! ५८ जागांवर ६२३ उमेदवार रिंगणात
तुमचे एक मत उत्तर प्रदेशच्या उज्वल भविष्याचा आधार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशच्या विकासासोबतच सुरक्षा, सन्मान आणि सुशासन देणाऱ्या सरकारसाठी नागरिकांनी मतदान करावे असे अमित शहा यांनी म्हटले आहे. तुमचे एक मत उत्तर प्रदेशच्या उज्वल भविष्याचा आधार आहे असे शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
आज उत्तर प्रदेश में प्रथम चरण का मतदान है। मैं इस चरण के सभी भाइयों-बहनों से अपील करता हूँ कि प्रदेश में विकास के साथ-साथ आपको सुरक्षा, सम्मान व सुशासन देने वाली सरकार को चुनने के लिए अधिक से अधिक संख्या में मतदान करें।
आपका एक वोट उत्तर प्रदेश के उज्ज्वल भविष्य का आधार है।
— Amit Shah (@AmitShah) February 10, 2022
भारतीय जनता पार्टीसाठी उत्तर प्रदेश हे कायमच एक महत्वाचे राज्य राहिले असून ही निवडणूक जिंकून पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलवायची त्यांचा संकल्प आहे. आत्तापर्यंतच्या सर्व मतचाचण्यांचा विचार केला तरी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपा सरकार येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.