बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन

बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. आज या टप्प्याच्या मतदानाला प्रारंभ झाला आहे.

आज होत असलेल्या मतदानाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगाली मतदारांना जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत

लॉकडाउनचे आणखी कडक निर्बंध

मुख्यमंत्री समोर आलेच नाहीत

फडणवीसांनी प्रियांकांना झापले!

पंतप्रधानांनी ट्विट करताना,

पश्चिम बंगालचे लोक नव्या विधानसभेसाठी मतदान करत आहेत. आज मतदानाच्या सहाव्या टप्प्यात आज ज्यांचे मतदान आहे, त्यांना जस्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करण्याची विनंती करत आहे.

असे म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ट्वीट केले आहे. त्यांनी देखील बंगाली मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

बंगालच्या सहाव्या टप्प्यातील सर्व मतदारांना विशेषतः युवा मतदारांना माझी विनंती आहे की बंगालच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्भयतेने मतदान करा. आपले एक मत गरीबांना आणि वंचितांना त्यांचा अधिकार देण्यासाठी या प्रदेशाच्या विकासासाठी आधारस्तंभ आहे.

बंगालमध्ये मार्च महिन्यापासून निवडणुकांना सुरूवात झाली. आठ टप्प्यांत ही निवडणुक होणार आहे. २९ एप्रिल रोजी या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडेल. बंगालसोबतच आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्रातील पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीचे मतदान देखील होऊन गेले आहे. या सर्व निवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहिर होणार आहेत.

Exit mobile version