विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

शुक्रवारी पहाटे विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत तेरा रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना आणि प्रकृती गंभीर असलेल्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण राज्यातील ठाकरे सरकारकडून अद्याप तरी कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये ९० रूग्ण कोविडवर उपचार घेत होते. हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग होता. या अतिदक्षता विभागात एकूण १७ रूग्ण उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे तीन-सव्वा तीनच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसीच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला आणि अतिदक्षता विभागात आग लागली. बघता बघता ही आग पसरत गेली.

यात हाॅस्पिटलचा दुसरा मजला जळून बेचिराख झाला आहे. अतिदक्षता विभागातील १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागातील ४ रूग्ण आणि हाॅस्पिटलचे कर्मचारी हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले आणि बचावले. त्यापैकी २ रूग्णांची प्रकृती सध्या गंभीर आहे. सध्या या हाॅस्पिटलमधील रूग्णांना दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा:

विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे निघाली ऑक्सिजन एक्स्प्रेस

पश्चिम बंगालमध्ये ७९.११% मतदान

‘आशिकी’चा सूर हरपला

विरारच्या विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये अग्नितांडव

केंद्रातल्या भाजपा सरकारकडून या घटनेची दखल घेतली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. विरार येथील कोविड रुग्णालयाला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वनही त्यांनी केले तर त्यासोबतच गंभीर जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली.

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमी असल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंडमधून ही मदत दिली जाणार आहे. ही सारी मदत पंतप्रधानांनी सद्भावनेतून जाहीर केली आहे.

Exit mobile version