मालवणी इमारत दुर्घटना: केंद्र सरकारने जाहीर केली मदत

मालवणी इमारत दुर्घटना: केंद्र सरकारने जाहीर केली मदत

मालाड मधील मालवणी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल थेट केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अपघातग्रस्तांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून यात ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवार, ९ जून रोजी मुंबईत कोसळलेल्या पावसाचा परिणाम होऊन ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे. तर या प्रकरणात इमारतीचा मालक आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा:

दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचा मंत्रालयावर मोर्चा

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदतही जायीर केली आहे. पंतप्रधान कार्यलयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या संबंधीचे ट्विट करण्यात आले आहे. ‘मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.’

राज्य सरकारचीही मदत
केंद्र सरकारच्या बरोबरीनेच राज्य सरकारमार्फतही मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेतील जखमींची रुग्नालयात जाऊन भेटही घेतली आहे.

Exit mobile version