पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

पुणे शहरापासून अंदाजे १६ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पिरंगुट भागात एका कारखान्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली आत्तापर्यंत या आगीत होरपळून १८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृत आणि जखमींना पंतप्रधानांनी मदत घोषित केली आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजूनही जाग आलेली नाही.

सोमवार, ७ जून रोजी संध्याकाळी पुणे नजीकच्या पिरंगुट भागातील उरवडे परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली. केमिकल प्लांटला लागलेल्या या आगीबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आग विझवायचा कार्याला सुरुवात केली. त्यासोबतच आगीत अडकलेल्या माणसांनाही सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या आगीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून ५ जण बेपत्ता असल्याचे समजत आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी स्वतःच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या

ठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?

सौ सोनार की, एक लोहार की

राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून मराठीतून पंतप्रधानांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना’ असे ट्विट मोदींनी केले आहे.

तर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे. पण अजूनही राज्य सरकारने या घटनेची दखल घेऊन काहीही मदत जाहीर केलेली नाही.

Exit mobile version