पंतप्रधानांनी मानले गुजरातचे आभार

पंतप्रधानांनी मानले गुजरातचे आभार

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्वीट करून गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा: 

गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

अमित शहा यांनी म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्य आणि केंद्र सरकार सातत्याने गरिबांच्या आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. त्याबरोबरच राज्याच्या जागतिक दर्जाच्या विकासासाठी देखील कटिबद्ध आहे. हे प्रचंड बहुमत लोकांचा भाजपाच्या धोरणांवरील विश्वासाचे प्रतिक आहे. अमित शहा यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला तेव्हा पत्रकारांशी बोलताना भाजपाच्या विजयाबाबत भाष्य केले होते.

नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करताना गुजरातच्या लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनीदेखील लोकांनी आपल्या धोरणांवर विश्वास दाखवल्याचे म्हटले आहे.

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, राजकोट, सूरत आणि भावनगर या सहा महापालिकांमधील निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमधील या सहा महापालिकांमधील ५७४ वॉर्ड्समध्ये निवडणूक झाल्या. यापैकी आत्तापर्यंत ४४६ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यातील ३८९ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ ३९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर १८ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे.

Exit mobile version