वाराणसीच्या उत्स्फूर्त जल्लोषात मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

१२ राज्यातील मुख्यमंत्री आणि १८ केंद्रीय मंत्री उपस्थित

वाराणसीच्या उत्स्फूर्त जल्लोषात मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. या भागात अंतिम टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी मतदान पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वाराणसी येथील काशी कोतवाल बाबा काल भैरव मंदिरात पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १२ राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच १८ केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा

पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणारा नांदेडमधून ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वाराणसीतूनच २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी पुन्हा भाजपाच्या तिकिटावर वाराणसीमधूनचं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हे आता हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version