26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियाराज्यांनी लक्षात ठेवावे, लॉकडाउन अंतिम पर्याय!

राज्यांनी लक्षात ठेवावे, लॉकडाउन अंतिम पर्याय!

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

महाराष्ट्रात एकीकडे कठोर लॉकडाउनची तयारी पूर्ण झालेली असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा अगदी शेवटचा पर्याय असला पाहिजे याचा विचार राज्यांनी करावा, असा ठोस संदेश देत लॉकडाउनपासून आपण स्वतःला वाचविले पाहिजे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना सर्व राज्यांना केली. पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री आपल्या संदेशात विविध मुद्द्यांना स्पर्श करत देशवासियांना या करोना संकटकाळात एकत्र राहण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे, अफवा व भीतीच्या वातावरणापासून दूर करण्याचे कळकळीचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात सांगितले की, राज्यांनी मायक्रो कन्टेनमेंट झोनचाच विचार करावा. त्यातूनच आपण अर्थचक्र सुरू ठेवू शकतो, आरोग्य सुधारू शकतो. या संकटकाळात अजिबात धैर्य न गमावता, शिस्तीचे पालन केले तर आपण देशाचे हे चित्र बदलू शकतो यावर विश्वास ठेवा. करोनाच्या या तुफानाला पराभूत करण्यासाठी आपले पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी, सामाजिक संस्था, झोकून देत काम करत आहेत. त्यांना सलाम करत पंतप्रधानांनी या कामात मुले, युवक यांनीही सहभागी व्हावे यासाठी आग्रह धरला. लॉकडाउन लागू नये यासाठी तरुणांनी पुढे येऊन आपापल्या विभागात शिस्तीचे, नियमांचे पालन होईल, याची काळजी घ्यावी. तर ते विभाग करोनामुळे सीलबंद करावे लागणार नाहीत. मोठ्यांनी घराबाहेर पडू नये याची काळजी छोट्यांनी घ्यावी. हे कामही खूप मोठा बदल घडवू शकते, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

अहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

पंतप्रधान मोदी यांनी करोनाविरुद्धच्या या युद्धात लसीकरणाची जी उपाययोजना केंद्राच्या वतीने करण्यात आली त्याचे कौतुक केले. भारतात आतापर्यंत १२ कोटी लसीचे डोस देण्यात आल्याचा उल्लेख करत या कार्यात भारतातील लस उत्पादन कंपन्यांची पाठ थोपटली. शिवाय, या करोना संकटकाळात भारतातील औषध कंपन्यांनी केलेल्या कामालाही त्यांनी शाबासकी दिली. आपले औषधनिर्मिती क्षेत्र कसे मजबूत आहे हे सांगताना त्यांनी या काळातही वेगाने औषधांची निर्मिती करत नागरिकांची गरज भागविल्याचा उल्लेख केला आणि अशा प्रबळ औषधनिर्मिती क्षेत्रामुळे आपण आपल्याला नशिबवान समजले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

उद्या म्हणजे बुधवारी २१ एप्रिल या दिवशी रामनवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तमाचा हा दिवस. त्यामुळे आपण मर्यादांचे कठोर पालन करायला हवे, करोनाविरुद्धच्या युद्धात सर्व नियमांचे पालन करा, असे पंतप्रधान म्हणाले. रमझानमधूनही आम्हाला धैर्य, शिस्त, संयम आदिंचा संदेश मिळतो. करोनाविरुद्ध त्याचीही गरज आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाउनच्या भीतीमुळे श्रमिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत, त्याबद्दल चिंता व्यक्त करत श्रमिकांनी आहे त्याच राज्यात राहण्याची विनंती पंतप्रधानांनी केली. श्रमिकांनी स्थलांतर न करता आहे त्या राज्यांत राहावे यासाठी राज्य प्रशासनांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांना तिथे लस मिळेल आणि त्यांचे कामही थांबणार नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्याकडे आता करोनाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारल्या गेल्याचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला. आज आपण पीपीई किट तयार करत आहोत, आपल्याकडे प्रयोगशाळा आहेत, कोविड सेंटर्स उभारली गेली आहेत, नव्या उपचारपद्धती डॉक्टरांनी माहीत करून घेतल्या आहेत, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा