जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश

देशभरात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेचं घोंगावणारं संकट या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींनी जनतेला बेड्स आणि इतर आवश्यक गोष्टींची योग्य माहिती देण्याच्या आणि औषधांचा काळाबाजार रोखण्याच्या सूचना केल्या. जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, याचं भान ठेवून काम करा, असंही मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे लोकांना त्रास आणखी त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना योग्य आणि अचूक माहिती द्या. रुग्णालयात किती बेड आहेत. त्यातील किती रिकामे आहेत. औषधांचा पुरवठा किती आहे, याची माहिती लोकांना द्या, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, असं मोदी म्हणाले.

तुम्ही जिल्ह्यात काय काय केले आहे, ते मला लिहून पाठवा. त्यातील नवीन गोष्टी इतर जिल्ह्यातही लागू करता येतील. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आव्हान आहे. तुमचा जिल्हा जिंकला तर देश जिंकेल. गावागावात हा संदेश गेला पाहिजे. तेच आपलं गाव कोरोनामुक्त करतील, असं मोदी म्हणाले.

लोकल कंटेन्मेंट झोन, आक्रमकपणे टेस्टिंग आणि लोकांना योग्य माहिती देणं ही आपल्याकडील कोरोनाच्या विरोधात लढण्याची हत्यारे आहेत, असं सांगतानाच औषधांचा काळाबाजार रोखा. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. काळाबाजार रोखला गेलाच पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. फ्रंट लाईन वर्कर्सचं मोरल वाढवलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नामुळेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. केवळ रुग्ण बरे करणेच नव्हे तर कोरोनाचा प्रसार होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कोरोनाच्या स्केलची योग्य आणि अचूक माहिती असेल तेव्हाच हे करणं शक्य होईल, असंही ते त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?

स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर इडी आणि सीबीआयचे छापे

जिल्ह्यातील नागरिकांच्या ‘इज ऑफ लिविंग’कडेही लक्ष दिलं पाहिजे. कोरोनाचा संसर्ग रोखतानाच दैनंदिन जीवनही सुरळीत ठेवायचं आहे. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात अधिक पसरणार नाही, याची काळजी घ्या. गावागावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. त्यांना चांगल्या आणि उत्तम आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version