उत्तर मुंबई लोकसभेचे भाजपा उमेदवार पियुष गोयल बोरिवलीत कार्यकर्त्यांची घेणार भेट

उत्तर मुंबई लोकसभेचे भाजपा उमेदवार पियुष गोयल बोरिवलीत कार्यकर्त्यांची घेणार भेट

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर काही विद्यमान खासदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश असून त्यांना उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तिथले विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना यावेळी उमेदवार म्हणून निवडणूक लढविता येणार नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोयल हे बोरिवली मतदार संघाला भेट देत आहेत. गुरुवारी ते बोरिवलीत येणार आहेत.

पियुष गोयल यांच्या स्वागताची तयारी भाजपा कार्यकर्त्यांनी केली असून मुंबईचा सुपुत्र मुंबईच्या सेवेत अशा अर्थाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. ते बोरिवली मतदारसंघात सायंकाळी ४ वाजता येणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर ते सिद्धीविनायक मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेणार आहेत.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीला अमेरिकेची शिष्यवृत्ती

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू”

पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!

उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे खासदार म्हणून मोठ्या फरकाने जिंकून आलेले आहेत. पण यावेळी त्यांना संधी नाकारण्यात आली असून पियुष गोयल यांचे नाव बुधवारी जाहीर करण्यात आले. यात मुंबई उत्तर पूर्वची जागाही निश्चित करण्यात आली असून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याजागी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक यांनी कोटेचा यांचे यानिमित्ताने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून तिकीट नाकारल्याबद्दल नाराजी प्रकट करण्यात आली पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली, पुष्पगुच्छ दिल्यानंतर त्यांच्याशी यासंदर्भात चर्चाही केली.

Exit mobile version