लखीमपूर प्रकरणी अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली

लखीमपूर प्रकरणी अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा ‘टेनी ‘ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी केलेली मागणी निराधार असल्याचे सांगत भाजपने ती फेटाळली आहे.

त्याचवेळी लखीमपूर खेरीचा मुद्दा विचाराधीन असल्याचे सांगत भाजपने चर्चेला नकार दिला. ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकर्‍यांना वाहनाने चिरडल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने भरपाई आणि सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या होत्या. लखीमपूर खेरी हिंसाचाराची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने ३ ऑक्टोबरची घटना हा पूर्वनियोजित कट असल्याचे सांगितल्यानंतर विरोधकांनी केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि लोकसभेचे कामकाज विस्कळीत केले होते.

अटकेत असलेला मिश्रा यांचा मुलगा या प्रकरणातील एक आरोपी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची चौकशी सुरू आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, विरोधकांची ही मागणी योग्य नाही, कारण संसदीय नियमांनुसार, न्यायालयात प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करू देत नाही.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

 

बारा खासदारांच्या निलंबनावरून गोयल यांनी विरोधकांना घेरले आणि त्यांच्याकडे जनतेशी निगडित मुद्दे नाहीत, ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ते म्हणाले की, महागाई आणि कोरोना या विषयावर चर्चा करायची होती, मात्र ते त्यापासून पळ काढत आहेत. बारा खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, त्यांचे वर्तन अयोग्य असून त्यांनी माफी मागावी. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात दोन भाजप कार्यकर्त्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version