दिल्लीमध्ये लोकायुक्त नियुक्त नसून आम आदमी पार्टी (आप) सरकारला दिल्लीत लोकायुक्त नियुक्त करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकायुक्त हे पद डिसेंबर २०२० पासून रिक्त आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने एका महिन्यात हे पद भरण्याचे निर्देश द्यावेत, असेही ते म्हणाले.
स्वतंत्र लोकपाल नियुक्ती करण्यात यावी या मागणीभोवती केंद्रीत असलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर आप सत्तेत आली. पक्षाच्या २०१३, २०१५ आणि २०२० च्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये स्वतंत्र लोकपाल नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ती पूर्ण झाली नाही.
हे ही वाचा:
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘भुजबळांची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो म्हणून एफआयआर
राजस्थानमध्ये वऱ्हाडाच्या कारला अपघात…नवरदेवासह नऊ जण ठार
“राज्य सरकार भूमाफिया, ड्रग माफिया, दारू माफिया, खाण माफिया, औषध माफिया, हॉस्पिटल माफिया, सोने माफिया, बेटिंग माफिया, टेंडर माफिया, हवाला माफिया, शाळा माफिया, कोचिंग माफिया, बेकायदेशीर इमिग्रेशन माफिया, धर्मांतर माफिया तसेच व्हाईट कॉलर माफिया जे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थानाच्या आधारावर समाजात फूट पाडतात अशांवर कारवाई होत नाही त्यामुळे, मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी माननीय न्यायालयाने सरकारला एका महिन्याच्या आत लोकायुक्त नियुक्त करण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.