राज्यातील खड्डे हा सर्वत्र चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे. अशातच ठाणे शहरातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाणे भाजपाचे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत प्रतिवादी म्हणून ठाणे महानगरपालिका एमएमआरडीए, ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, तसेच महापौर नरेश म्हस्के यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
ठाणे शहर हे राज्यातील काही प्रमुख शहरांपैकी एक आहे. पण शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ठाणेकर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो. ठाणे शहरातल्या आणि शहराला जोडणाऱ्या घोडबंदर रोड, ठाणे-नाशिक बायपास, पूर्व द्रुतगती महामार्ग या भागात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य ठाणेकर नागरिकाचे प्रचंड हाल होतात.
हे ही वाचा:
‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर
मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे
शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात
या सर्व बाबी विचारात घेता ठाण्यातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सचिन मोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका सुओ मोटो याचिकेवर निकाल देताना राज्य सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. रस्ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे न्यायमूर्ती ओक यांनी या सुनावणी दरम्यान म्हटले होते. या तत्त्वांची ठाणे शहरात अंमलबजावणी व्हावी आणि शहरातील खड्डे हे युद्ध पातळीवर भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मोरे यांनी आपल्या जनहित याचिकेत केली आहे.