देवेंद्र फडणवीसांच्या फोटोची ट्विटरवर चर्चा

विधानभवन परिसरातील फोटो व्हायरल   

देवेंद्र फडणवीसांच्या फोटोची ट्विटरवर चर्चा

विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १७ जुलै पासून सुरुवात झाली. यंदाचे अधिवेशन वादळी ठरणार असल्याच्या चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस यांनी पायातले बूट काढून हातात घेतले आणि ते अनवाणी पायाने विधानसभेत पोहचले. याचा फोटो व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पोहचले तेव्हा पाऊस पडत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी छत्री हातात धरली होती आणि त्यावेळी चालत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पायातले बूट काढून हातात घेतले. बूट हातात घेऊन अनवाणी पायाने देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पोहचले. बूट पाण्यात भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे.

भाजपा नेत्यांकडून या कृतीवर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांनी इन्सपायरिंग असा शब्द लिहित फडणवीसांचा फोटो ट्वीट केला आहे. तर, संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनीही हाच फोटो ट्वीट केला आहे. फडणवीस यांचा साधेपणा, सामान्यांचा असामान्य नेता अशी विधाने सोशल मीडियावर दिसून आली.

हे ही वाचा:

सीमा हैदरचा बदला म्हणून पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू मंदिरावर रॉकेटहल्ला

सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ

वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग

मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

राज्यातील अनेक नाट्य घडामोडीनंतर सोमवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राजकीय परिस्थिती पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याच्या चर्चा होत्या. शोक प्रस्ताव सादर झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीचं कामकाज मंगळवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

Exit mobile version