ठाकरे सरकारने होळीवर बंदी आणल्यापासून ठाकरे सरकारवर सर्व स्तरांवरून विरोध होतोय. ठाकरे सरकारने, स्वतःच्या घराच्या दराबाहेरही होळी पेटवायला मनाई करून तसं केल्यास गुन्हा दाखल होईल असे सांगितले आहे. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार. pic.twitter.com/WVDfdCJORw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
“‘शब-ए-बारात’ला मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी, पण होळीच्या सणाला पूर्णपणे बंदी. या ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला, भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध आहे. होळी हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे आणि म्हणून मर्यादित संख्येत उपस्थित राहून आज मुंबईभर होळी प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेप्रमाणे साजरी करावी, हे भारतीय जनता पार्टी मुंबईचं आवाहन आहे, हा आमचा निर्णय आहे.” असे आवाहन अतुल भातखळकरांनी मुंबईकरांना केले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?
पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
“हिम्मत असेल तर ठाकरे सरकारने पोलिसांना सांगून, आमच्यावर कारवाई करून दाखवावी. कोरोनाचे नियम पाळू, पण होळी मात्र, आमच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे, ती मात्र आम्ही साजरी करणारच.” असा इशारा भातखळकरांनी ठाकरे सरकारला दिला आहे.