मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशे़डचे काम रखडलेले असताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आता लक्ष्य करण्यात आले आहे. मरोळमार्गे आरेमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या भिंतींवर अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरेंच्या नावे नाराजी व्यक्त करणारे संदेश लिहिले आहेत.
‘आदित्य क्या हुआ तेरा वादा’, ‘आदित्य होश मे आओ’ अशी वाक्ये आरेच्या रस्त्यावर लिहिण्यात आली आहे. आरे मेट्रो ३ कारशेडच्या उभारणीवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु असून हा वाद मिटण्याची अजून चिन्हे नाहीत. यापूर्वी आरे कारशेडसाठी झाडे तोडण्यावरून वाद झाला होता. तेव्हा शिवसेनेने वृक्षतोडीवरून पर्यावरण प्रेमींच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अद्यापही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची भेट घेतलेली नाही.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू
मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही
महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला
शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींना भेटून आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. बुधवार, १८ मे रोजी सकाळी आरेतील मरोळ मार्गावरील भिंतीवर आदित्य ठाकरेंच्या नावाने संदेश लिहिल्याचे दिसून आले. यानंतर हे संदेश लिहिणारे कोण आहे हे अद्याप समजलेले नाही.