मोर्चा शांततेने व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा सुव्यवस्थ नीट राहील एवढ्या पुरताच त्यात शासनाचा हस्तक्षेप असेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे
येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीकडून मुंबईत हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांकडून अजून परवानगी देण्यात आलेली नव्हती. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी फडणवीस यांना विचारले. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की , माझ्या माहितीप्रमाणे मोर्चाला परवानगी मिळालेली आहे. त्यांनी मोर्चाचा जो मार्ग सांगितलेला आहे, तो मान्य झाला आहे.त्यामुळे परवानगी देण्याबाबत काही अडचण आहे असं वाटत नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे विधान केलं होतं. या बाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वारकरी, संतांबद्दल बोलतात, प्रभू श्रीराम, कृष्णाबद्दल जे काही उदगार काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बोललं जातंय, अशा प्रकारच्या वक्तव्याविरोधात लोकांमध्ये मोठा संताप आहे. तो व्यक्त करावाच लागेल.
हे ही वाचा :
संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला
हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ
समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू
त्यांच्या पक्षावर कोणाचा विश्वास नाही. जर ते दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल. कालपर्यंत ते चांगले होते.ही जी काही भाषा ते वापरतात त्याचा लोकांना राग येतो, लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत असा जोरदार प्रहार फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. नाशिकमधील ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टिकेला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.