महाराष्ट्रात कोविडचे प्रमाण कमी कमी होऊ लागल्यानंतर काही शहरांतील निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईचा क्रमांक लागला मात्र रुग्णसंख्या कमी होत असूनही पुण्याला मात्र सूट देण्यात आली नव्हती. याबाबत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे सरकारला उपरती होऊन, आता पुण्यात देखील सूट देण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. आता पुण्यात सुद्धा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे दुकानं रात्री ८ तर हॉटेल १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
पुण्यात असे आहे नियम
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरू ठेवता येणार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
– राज्याप्रमाणे पुण्यात सुद्धा मंदिरं बंद राहणार
– गणेशोत्सवाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार
– दुकानातील कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस बंधनकारक
– मास्क वापरणे सक्तीचे
हे ही वाचा:
नार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि…
नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वतावरण खराब
४०० लोक उतरले रस्त्यावर आणि केली कमाल
‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’
यामध्ये पुण्यातील लोकांना थोडा दिलासा दिला असला तरीही पूर्णपणे मोकळीक देण्यात आलेली नाही. मॉलमध्ये केवळ लसीचे दोन डोस घेतले असले तरच जाता येणार असल्याने पालकांसोबत येणारी लहान मुले अथवा आत्तापर्यंत केवळ एकच डोस झालेले तरूण यांचे काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. गणेशोत्सवाबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने देखील सरकारवर टीकेची झोड उठली आहे. ही मोकळीक देताना जर पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावावे लागतील असा, इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकवर लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. यात ते कोणते मुद्दे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आधीच उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर करून टाकल्याने या सरकारमधील नसलेला ताळमेळ पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आला आहे.