भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे लोक राष्ट्रवादीत असू शकतात, जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांचे सूचक विधान

भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे लोक राष्ट्रवादीत असू शकतात, जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं शरद पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केले आहे. भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु, त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र, माझ्यासमोर असं मत कुणीही व्यक्त केलेलं नाही, असं विधान जयंत पाटील यांनी ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत केलं.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपामध्ये जाण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या नाट्याला पूर्णविराम देण्यासाठी शरद पवारांनी ही चाल चालल्याची चर्चा आहे. त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानाने पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले

‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता करत डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध!

जयंत पाटील असंही म्हणाले की, राष्ट्रवादीला आज राज्यात विस्तारण्याची संधी आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी ब्रेक व्हावी, असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Exit mobile version