शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली. आता पीएमएलए न्यायालयाने राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांवर पत्राचाळ प्रकरणी कारवाई झाली आणि यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा खोचक टीका केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक, अनिल देशमुख आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासोबत शरद पवार यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत शरद पवारांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा हात पकडला आहे. तसेच याच फोटोत हाही फोटो जोडण्यात आलाय ज्यामध्ये शरद पवारांनी संजय राऊतांचा हात पकडला आहे. हे सगळे फोटो एकत्र करून त्याला खाकस्पर्श असे म्हणत, शरद पवारांना नेटकऱ्यांनी हिणवलं आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा तो फोटो ट्विटरवर टाकला आहे. शरद पवारांचा हात ज्यांनी पकडला त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि शेवटी त्यांना तुरुंगात जावे लागले अशी खिल्ली उडविली जात आहे.
सचिन वाझे यांच्यावर मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर आणि खंडणी वसुली करणे तसेच मनसुख हिरेन याच्या हत्येच्या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचाही आरोप वाझेंवर आहे. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांनी सखोल चौकशी सुरू केली. सखोल चौकशीतूनच पुढे अनिल देशमुख अडचणीत सापडले होते. अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
खाकस्पर्श… pic.twitter.com/uBs5qq0qal
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत अचिंता शेउलीला सुवर्णपदक; भारताच्या नावे सहावं पदक
संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी
कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख
तसेच कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. आता संजय राऊतांना पीएमएलए न्यायालयाने ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.