अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!

काँग्रेस पक्षाचा झेंडा हिसकावत लोकांनी पायदळी तुडवला

अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.याबाबत देशासह जगभरातील राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.सोहळ्यापूर्वीच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे काही कार्यकर्ते राम मंदिराबाहेर दर्शनासाठी गेले असता काही लोकांबरोबर त्यांची हाणामारी झाली.काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्या पक्षाचा झेंडा हिसकावून फाडण्यात आला.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह पक्षाच्या नेत्यांचा एक गट राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचला असताना ही घटना घडली. हा सगळा वाद काँग्रेसचा झेंडा फडकावण्यावरून झाला. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्ते ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत होते.तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केला.यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला असता, तिथल्या लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झेंडा हिसकावून घेतला.

हे ही वाचा:

अरुण योगीराज यांनी कोरलेल्या मुर्तीवरच अभिषेक होणार!

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

अयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

एटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून आले २१ लाख रुपये!

लोकांनी झेंडा हिसकावत पायदळी तुडवला.या घटनेचा व्हिडिओमध्ये व्हायरल झाला.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही नागरिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झेंडा हिसकावून घेतला आणि घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा झेंडा पायदळी तुडवला. यावेळी काही अंतरावर उपस्थित असलेले पोलीस मूक प्रेक्षक बनून बघत राहिले.प्रकरण वाढल्यावर पोलिसांनी ध्वज हिसकावणाऱ्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला.या संपूर्ण प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता.

या घटनेनंतर घटनास्थळी काँग्रेस नेत्यांची गर्दी सुरू झाली.काँग्रेसच्या गटाकडून घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.तर दुसरीकडे काही लोकांनी एकजूट होऊन काँग्रेसविरोधात घोषणाबाजी सुरु केली.विरोध करणाऱ्या लोकांचे म्हणणे होते की, काँग्रेस नेते राम मंदिरात आले होते तेव्हा प्रभू रामाचा किंवा देशाचा झेंडा घेऊन यायला हवे होते.काँग्रेसचा झेंडा येथे आणण्याची काय गरज होती? असा प्रश्न तेथील लोकांनी उपस्थित केला.

 

 

Exit mobile version