‘उत्तर प्रदेशची जनता घराणेशाहीचा पराभव करेल’

‘उत्तर प्रदेशची जनता घराणेशाहीचा पराभव करेल’

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सातत्याने सर्व पक्ष प्रचार करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहराइचमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित केले आहे. यावेळी केवळ समाजवादी पक्ष आणि त्यांचे प्रमुख अखिलेश यादव हेच पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर होते. त्यांनी अखिलेश यांचे नाव न घेता त्यांना वारंवार कुटुंबाचा माणूस म्हणून संबोधले आहे.

भाजपच्या योजनांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, जर पुन्हा सपाचे सरकार आले तर सपा ह्या योजना पुढे नेणार नाही. माफियांना संधी मिळाली तर हे लोक गरिबांच्या योजना बंद करतील. आणि पुन्हा गुन्हेगारी वाढेल. युपीच्या जनतेला त्यांचे भले कशात आहे हे माहिती आहे, म्हणूनच  यूपीच्या जनतेने सलग तीनदा कुटुंबवाद्यांचा पराभव करून भाजपाला विजयी केले आहे. यावेळीही घराणेशाहीचा पराभव करण्याची तयारी करण्यात आली आहे.

पुढे ते म्हणाले की, मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शाळांची स्थिती सुधारली जात आहे. पाच वर्षांत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. मुद्रा योजना आणि स्टार्टअपसाठी सरकार जनतेला मदत करत आहे. तसेच रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जात आहेत. गावात वेलनेस सेंटरही सुरू होत आहेत. हे सर्व भेदभावाशिवाय  घडत आहे. त्याशिवाय यूपीमध्ये युपीच्या जनतेसाठी अजून नवीन योजना आखल्या आहेत.

हे ही वाचा:

रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत

भाजपचे सरकार नेहमी गरिबांच्या पाठीशी उभे राहते. कोरोनाच्या काळात गरीबांबद्दलची भाजपची ही संवेदनशीलता जगणे अनुभवली आहे. अशा संकटाच्या वेळी सरकार जनतेचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होते. एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट दर्जाची पण स्वस्तात मिळेल, अशा खाद्यपदार्थांची दुकाने उघडण्यात आली आहेत. महामारीच्या काळात देशातील ८० कोटी लोकांना आणि उत्तर प्रदेशातील १५ कोटी लोकांना मोफत रेशन वाटप केले आहे. असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

Exit mobile version