राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ते ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावरून आता उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेती आहे. मंगळवार, १० एप्रिल रोजी बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली आहे.

अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर बृजभूषण यांच्यासह अनेक साधुसंत आणि महंतांनी रॅली काढली आहे.

यावेळी बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले की, ‘राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केले तरच राज यांना अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.’

हे ही वाचा:

रेल्वे स्थानकावर जीवंत स्फोटके सापडल्याने नागपूरमध्ये खळबळ

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

पुढे ते म्हणाले, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या या भूमिकेवर राज ठाकरेंनी अजूनही भाष्य केलेले नाही.

Exit mobile version