गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत विरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. किरीट सौमय्या हे संजय राऊत आणि शिवसेनाविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज सकाळी किरीट सौमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका करत काही प्रश्न विचारले आहेत.
किरीट सौमय्यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा धारेवर धरले आहे. कोर्लई १९ बंगाल्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अजूनही उत्तर दिलेले नाही. मात्र हे ठाकरे साहेबांच्या १९ बंगल्याचे सत्य महाराष्ट्राला समजले पाहिजे असे किरीट सौमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, २०१८ मध्ये आत्महत्या करून मरण पावलेल्या इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांना किरीट सौमय्या यांनी धमकी दिली होती. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. असा आरोप संजय राऊत यांनी किरीट सौमय्यावर केला होता. हे आरोप सौमय्या यांनी फेटाळून लावले असून उलट नाईक यांच्या घरचा कर सौमय्या यांनी भरला होता असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राऊत यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला मध्ये आणू नये असे आश्वासन सौमय्या यांनी राऊतांना दिले आहे. संजय राऊत सध्या घाबरलेले असून ते काहीही बरळत आहेत.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट
मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
संजय राऊत यांनी कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे असे सोमय्या यांनी म्हटले. कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.