राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने घौडदौड सुरू केली आहे. दरम्यान, विजयाच्या दिशेने जाणाऱ्या महायुतीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून प्रतिक्रियाही देण्यात येत आहेत. अशातच भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनीही महायुतीच्या एकहाती विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे. भाजपा आणि शिवेसना यांची नैसर्गिक युती होती. ही युती उद्धव ठाकरेंनी २०१९ ला तोडली. त्याचा राग बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता. तो आता दिसून आला. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचं धनुष्यबाण आणि हिंदुत्त्वाचं शिवसेना नाव हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात असलेल्या भाजपाबरोबर आणलं,” असं विनोद तावडे म्हणाले. ठाकरे गटावरही विनोद तावडे यांनी टीका केली असून त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणारं वक्तव्य भांडूपवरून यायचं, असा निशाणा त्यांनी साधला.
हे ही वाचा:
राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!
राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला
भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!
नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा
दरम्यान, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात बदनामीबद्दल १०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे. विरार येथील विवांता हॉटेलमध्ये तावडे यांच्याकडून कथित पैसेवाटप करण्यात आल्याचे आरोप बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते.