श्रीलंका राष्ट्राध्यक्ष राजपक्षेंच्या घरात सापडले कोट्यवधी रुपये

श्रीलंका राष्ट्राध्यक्ष राजपक्षेंच्या घरात सापडले कोट्यवधी रुपये

जनतेने घेतला निवासस्थानाचा ताबा

लंकेत सध्या अत्यंत वाईट स्थिती आली असून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपले निवासस्थान सोडून पोबारा केल्यानंतर जनतेने या निवासस्थानाचा कब्जा घेतला आहे. त्यात त्यांना करोडो श्रीलंकन रुपयांची संपत्ती सापडली आहे. ती मोजतानाचे व्हीडिओ आता व्हायरल होत आहेत.

श्रीलंका सध्या दिवाळखोर बनली असून महागाईने शिखर गाठले आहे. अशा परिस्थितीत गोटाबाया राजपक्षे यांनी पळ काढला आहे. तेव्हा त्यांच्या घरात सर्वसामान्य जनतेने धडक देत त्यावर कब्जा मिळविला आहे.

श्रीलंकेतील डेली मिरर या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हे मिळालेले लाखो रुपये सुरक्षा दलांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच लोकांनी त्यांच्या घरात धडक दिली. घरात प्रवेश केल्यावर त्यांनी तिथल्या स्वीमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला, त्यांच्या स्वयंपाकघरातही ते घुसले.

हे ही वाचा:

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

एलेना रिबाकिना ठरली विम्बल्डनची सर्वात तरुण चॅम्पियन

आईची हत्या करून युवकाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

दरम्यान श्रीलंकेचे पर्यटन मंत्री हारिन फर्नांडो आणि कामगार मंत्री मनुषा नानय्यकारा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकन जनतेने पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घराचाही ताबा घेतला आहे. त्यांनी हे घर जाळून टाकले.

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. पण तरीही या आंदोलकांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या घरात प्रवेश केला आणि ते घर जाळून टाकले.

मे महिन्यात विक्रमसिंघे यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती. पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Exit mobile version