ठाकरे सरकारचे दीड हजार रुपये अजून लोक शोधत आहेत

ठाकरे सरकारचे दीड हजार रुपये अजून लोक शोधत आहेत

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता दिला. प्रत्येक लाभार्थीसाठी २ हजार रुपयांच्या हप्त्यासाठी एकूण १८९२ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबद्दल ट्वीटरवरून मोदींचे अभिनंदन केले आहे. त्याबरोबरच त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ वेगाने झाल्याने ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. त्यावेळी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. मात्र ते दिले गेले नसल्यावरून अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, की कोरोना काळात मोदी सरकारने कोणतीही सबब न देता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्यातील २ हजार रुपये दिले. मात्र ठाकरे सरकारचे दीड हजार रुपये लोक अजून शोधत आहेत.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

ठाकरे सरकारच्या एकूणच कामकाजावरून अतुल भातखळकरांनी विविध वेळी टीका केली आहे. त्यामध्ये लसीकरणाच्या नियोजनातील गोंधळ, लस खरेदीवरील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमधील असलेला समन्वयाचा अभाव इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी वेळोवेळी ट्वीटरवरून सरकारवर चौफेर टीका केली आहे. अतुल भातखळकर हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार आहेत.

Exit mobile version