जम्मू काश्मीरमध्ये विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाला पुन्हा एक जोरदार धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने (पीडीपी) स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाची संसदीय समिती लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करेल. याआधी नॅशनल कॉन्फरन्सने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये झालेल्या बैठकीनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष पूर्णपणे तयार आहे, असे स्पष्ट केले. लवकरच लोकसभा जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. मोहम्मद सरताज मदनी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे संसदीय मंडळ लवकरच उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप देतील, अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
उत्तर प्रदेश: पंतप्रधान मोदींनी कल्की धाम मंदिराची केली पायाभरणी!
“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”
माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन
याआधी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या ताब्यात असणाऱ्या जागांव्यतिरिक्त अन्य जागांवर आघाडी करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. तेव्हा पीडीपीने पक्षाचा हेतू एकजूट करण्याचा असला तरी नॅशनल कॉन्फरन्सच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.