गोठवलेल्या पराठ्यांवर जीएसटी लावल्याने अरविंद केजरीवाल करपले

१८ टक्के जीएसटी लागू

गोठवलेल्या पराठ्यांवर जीएसटी लावल्याने अरविंद केजरीवाल करपले

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या राज्यात भाजपला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष तयार आहे. दरम्यान, गुजरातमध्ये गोठवलेल्या पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लागू केल्याने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल चांगलेच करपले आहेत.  इंग्रजांनी खाद्यपदार्थांवरही कर लावला नव्हता असे म्हणत त्यांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे.

केंद्र सरकारने लावलेला उच्च जीएसटी हे देशातील महागाईचे प्रमुख कारण आहे. जीएसटी कमी करून जनतेची महागाईतून सुटका करावी, असे केजरीवाल म्हणाले. गुजरात अपील प्राधिकरणाने गुरुवारी पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी मंजूर केला आहे. पराठे हे सामान्य चपात्या किंवा पोळी पेक्षा वेगळे असतात. त्यामुळे पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. कारण पराठे हे चपातीमध्ये म्हणून वर्गीकृत करता येत नाहीत असं निरिक्षण विवेक रंजन आणि मिलिंद तोरावणे या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नोंदवले आहे .

हे ही वाचा:

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

अहमदाबादमधील ‘वाडीलाल इंडस्ट्रीज’ या कंपनीने पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याची याचिका दाखल केली होती. ही कंपनी आठ प्रकारचे फ्रोझन पराठे बनवते. चपाती आणि पराठा यामध्ये फारसा फरक नसल्याचा कंपनीचा विश्वास आहे कारण दोन्ही पिठापासून बनवले जातात.त्यामुळे पराठ्यांवर १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लावावा, अशी मागणी कंपनीने केली आहे. तथापि, जनरल अँटी-अव्हायडन्स नियामकांनी कंपनीची मागणी नाकारली आणि पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कायम ठेवला आहे

Exit mobile version