पुण्यात बड्या उद्योगपतीच्या घरी पवार पुतण्या- काकांची गुप्त भेट

दोन पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यात बड्या उद्योगपतीच्या घरी पवार पुतण्या- काकांची गुप्त भेट

राज्यातील शिवसेना पक्षानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील उभी फूट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. मात्र, त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार कार्यकर्त्याच्या गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर पवार काका-पुतण्यामध्ये चर्चा झाली आणि नंतर अजित पवार बाहेर पडले, असं मध्यामांकडून सांगण्यात येत आहे. काहींच्या मते जयंत पाटील हे देखील यावेळी बैठकीसाठी उपस्थित होते.

नेमकं काय घडलं?

कोरेगाव पार्कमधून अजित पवारांची नेहमीची गाडी बाहेर पडली पण ती रिकामी होती. चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार हे दुसऱ्याच एका गाडीमध्ये बसल्याचं दिसून आलं. माध्यमांच्या कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी अजित पवार थोडे लपल्याचे दिसून आले. पण, चालकाच्या चुकीमुळे ही गाडी चोरडिया यांच्या बंगल्याच्या गेटला धडकली.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही उपस्थित होते. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडले. त्याच्यानंतर साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील हे बाहेर पडले. त्यानंतर पावणे सातच्या सुमारास अजित पवार हे या ठिकाणाहून बाहेर पडले.

हे ही वाचा:

दहशतवादी नाचण कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन तगडे

‘१८३ एन्काऊंटरबाबत अहवाल द्या’

आता फसवणुकीसाठी ‘४२०’ नव्हे ‘३१६’ कलम

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार

अजित पवारांची कथित गाडी बंगल्याबाहेर पडल्यानंतर पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येतंय. काकामात्र, आता या दोन पवारांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि या भेटी मागचे रहस्य काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version