शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा.महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज(११ एप्रिल) नांदेड दौऱ्यावर होते.सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असेल तर प्रतापराव चिखलीकरांना निवडून देण्याचं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला केलं.विरोधकांवर टीका करताना अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आले आहेत. नकली उद्धव सेना, शरद पवार आणि उरलेली काँग्रेस असे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे.या तिघांची एक ऑटो रिक्षा आहे, मात्र रिक्षाचे सर्व पार्ट वेग-वेगळे आहेत.या रिक्षेची काही दिशाच नाही. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे लढतो आहोत. असं अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज
‘भारत-चीन यांच्यातील प्रदीर्घ सीमावादावर तातडीने लक्ष देण्याची गरज’
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के.कविता यांना सीबीआयकडून अटक!
ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं.शरद पवारांनी याचा हिशोब द्यावा.काँग्रेसवाल्यांना वाटते वातावरण बिघडले आहे, मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे.नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंत्रप्रधान करण्याची ही निवडणूक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे प्रचंड मतांनी प्रतापराव यांना विजयी करण्याचे आवाहन अमित शाह यांनी केलं.मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था ११ व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली असल्याचे देखील शाह यांनी सांगितले.
अमित शाह पुढे म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे काश्मीरचा अन् महाराष्ट्राचा काय संबंध? असे बोलतात. पण काश्मीर हे पूर्ण देशाचं आहे. याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार असल्याचे म्हणाले. कलम ३७० हटायला हवं होतं की नाही?, असा प्रश्न शाह यांनी जनतेला विचारला तेव्हा जनतेतून एकच होकाराचा आवाज आला.मोदींनी कलम ३७० रद्द करत काश्मीर भारताशी जोडण्याचं काम केलं.सोनिया-मनमोहन यांच्या काळात दहशतवादी हल्ले होत होते,
मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आज पाकिस्तानची देशाकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मत नाही. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात्त घुसून त्यांना मारले. मोदींनी तसा जगाला मोठा संदेश दिला आहे, आमच्या देशाकडे, सीमांकडे नजर उचलून पाहाल तर आम्ही त्याला सोडणार नाही जशाच तस उत्तर देऊ, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.