पवारांच्या मेट्रो प्रवासावर भाजपाची टीका

पवारांच्या मेट्रो प्रवासावर भाजपाची टीका

पुण्यातील मेट्रो रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आणि प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणे मोदींनी टाळले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र सोमवारी मेट्रोच्या ट्रायल रनसाठी मेट्रोतून प्रवास केला. मात्र पवारांच्या या कृतीचा निषेध भाजपाने केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. कोणत्या अधिकारात शरद पवार हे मेट्रोतून प्रवास करत होते, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे भाजपाचे आमदार यासंदर्भात विधानसभेत विशेषाधिकाराचा भंग झाल्यासंदर्भात प्रस्ताव आणतील. कारण या मेट्रो प्रवासादरम्यान तेथील स्थानिक आमदारांना आमंत्रित करण्यात आले नाही.

हे ही वाचा:

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू

पंतप्रधान सुरक्षा दिरंगाईप्रकरणातील माजी न्या. इंदू मल्होत्रांना धमकी

‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’

 

पवारांनी या मेट्रो रेल्वेच्या कामाची पाहणी यादरम्यान केली. त्यानंतर ते फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड स्टेशन असा प्रवास त्यांनी केला. या दोन स्टेशन्समधील अंतर सात किलोमीटर इतके आहे. मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, पवारांना मेट्रो रेल्वेच्या एकूण कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. स्टेशन्सच्या वैशिष्ट्यांबाबतही त्यांना माहिती देण्यात आली.

पुण्यात मेट्रोच्या दोन मार्गिका विकसित होणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर पीसीएमसी स्वारगेट कॉरिडोरमध्ये १४ मेट्रो स्टेशन्स होणार असून १६ किमीचा हा मार्ग असेल.

Exit mobile version