28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण'काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार'

‘काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’

Google News Follow

Related

ज्या काँग्रेसपासून फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्या काँग्रेसची नेमकी स्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाबद्दल एक टिप्पणी केली. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात असे विचारल्यावर पवार म्हणाले, ‘काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.’

संबंधित मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.

हे ही वाचा:

पवई तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी अयान ठरला ‘हिरो’

प्रकल्पाच्या माहितीवर पालिकेची मगर’मिठी’

मालमत्ता खरेदी लोक चालले दक्षिण मुंबईला!

लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

मुलाखतीमध्ये बोलताना पवार म्हणाले, ‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. होती हे मान्य केलं पाहिजे.’ काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले. एकप्रकारे पवारांनी दुबळी काँग्रेस हेच तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं स्पष्ट केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा