पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?

पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?

एकीकडे महाविकास आघाडीतील सगळे पक्ष एकत्र आहेत. निवडणुकांतही एकत्रच लढू असे दावे राणी भीमदेवी थाटात केले जात असले तरी काँग्रेस पक्षाला मात्र ते मान्य नाही. आगामी सगळ्या निवडणुकांत आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणूनच निवडणूक लढवू. मला मुख्यमंत्री झालेले पाहायला तुम्हाला आवडणार नाही का, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थान काय असेल, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अमरावती येथील दौऱ्यात पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

गंगेतील मृतदेहांवरील कविता म्हणजे एक कट

सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय

गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!

…आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली

राज्यांत २०२४ला आपला पक्ष सर्वाधिक मते मिळविणारा पक्ष असेल असे छातीठोकपणे सांगताना मुख्यमंत्री म्हणून मला पाहणे तुम्हाला आवडणार नाही का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उमटले आहे.

शरद पवारांनी काल शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यावरून पटोले म्हणतात की, काँग्रेस हाच मूळ पक्ष आहे. आम्हाला कुणाचे प्रमाणपत्र नको. काँग्रेस हाच २०२४मध्ये आघाडीवर राहील.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवत म्हटले आहे की, नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तर राहुलजींना पंतप्रधान व्हावेसे वाटते. जनतेला मात्र तसे अजिबात वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही, हाच या दोघांचा प्रॉब्लेम आहे.

Exit mobile version