मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत  आहे, तर मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. भंडारा जिल्ह्यात रुग्णांचे मृत्युपुर्वी हाल तर होत आहेतच, परंतु प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मृत्युनंतरही त्यांची सुटका झालेली नाही.

कोरोना बाधितांचा मृतदेह प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अर्धवट जाळला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे लचके भटक्या कुत्र्यांकडून तोडले जात आहेत. भटक्या कुत्र्यांनी ते लचके गावात आणल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याबरोबरच लोकांमध्ये संतापाचे वातावरण देखील आहे.

हे ही वाचा:

मुघलांच्या जिझिया करासारखी वीजबिलांची वसूली केली

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

भाजपाचे माजी आमदार पास्कल धानारे यांचे कोरोनामुळे निधन

भंडारा जिल्ह्यातील कचरखेडा (भिलेवाडा) पुनर्वसन या गावातील स्मशानभूमीत कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. परंतु तेथील कर्मचारी अपुरी लाकडे टाकत असल्याने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहत आहेत. भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहांचे लचके तोडायला सुरूवात केली असल्याचा धक्कादायक आणि सुन्न करणारा प्रकार पहायला मिळाला आहे.

या प्रकारावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. “भंडारा जिल्ह्यात अर्धवट जळलेल्या कोरोना रुग्णांची प्रेतांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे व काही मृतदेह ओढून गावात आणल्याचे संतापजनक वृत्त आले आहे. ठाकरे सरकारच्या बेपर्वाई कारभारामुळे जिवंत रुग्णच नव्हे तर मृतदेहांचीही विटंबना सुरू आहे. सरणावर गेल्यानंतरही सुटका नाही.” अशी खरमरीत टिका अतुल भातखळकरांनी ट्वीटरवरून केली आहे.

Exit mobile version