भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘नुक्कड नाटकच्या’ मार्गाने आदरांजली

भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘नुक्कड नाटकच्या’ मार्गाने आदरांजली

लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून जोर लावला जात आहे. यात आता जनजागृतीच्या जुन्या परंतु परिणामकारक मार्गाचा अवलंब केला जात आहे. भाजपाच्या प्रचार मोहिमेदरम्यान विरोध दर्शवण्यासाठी पथनाट्याचा किंवा नुक्कड नाटक या पारंपारिक लोककलेचा वापर केला जात आहे. लोकांशी करायच्या संवादासाठी हे प्रभावी माध्यम ठरले आहे.

हे ही वाचा:

बंगालमध्ये खोट्या मतांसाठी पोलिसांचीच फिल्डींग?

सध्या ट्वीटरवर अशाच तऱ्हेचे नुक्कड नाटक सादरीकरणाचा एक व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे. यात ते भाजपाच्या कार्यकर्त्यांची पक्षासाठी काम करताना झालेल्या निर्घृण हत्येबद्दल जनजागृती करताना दिसत आहेत. त्यासाठी हे कार्यकर्ते बंगली, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून ही नाटीका सादर करत आहेत. यात ते पक्षासाठी प्राण गमावलेल्या १३० कार्यकर्त्यांबद्दल बोलत आहेत. हा मुद्दा या नाटकांसोबतच भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांकडूनही विविध व्यासपीठांवर गेला आठवडाभर सातत्याने उठवला जात आहे.

या नाटकात भाजपा कार्यकर्ता गोपाल मुजुमदार याचा देखील उल्लेख आहे. या कार्यकर्त्याच्या उत्तर डमडम येथील घरी त्याच्या आईवर निमता वर २७ फेब्रुवारी रोजी अतिशय क्रुर तऱ्हेने हल्ला करण्यात आला होता.

पथनाटिका हा बंगालमधील प्राचीन कला प्रकार असून, सामाजिक संदेश पोहोचवण्याचे हमखास माध्यम आहे. जवळपास चार दशके डाव्या चळवळीकडून हा कलाप्रकार विविध विषय मांडण्यासाठी वापरला गेला होता. डाव्यांच्या राजकारणासाठी हा कलाप्रकार जवळपास समानार्थी शब्द झाला होता.

आता या कलेच्या सहाय्याने भाजपाचे कार्यकर्ते त्यांना पश्चिम बंगालमध्ये तोंड द्याव्या लागणाऱ्या वस्तुस्थितीला मांडत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध, समाजमाध्यमांवरील स्वातंत्र्यावर असलेली बंधने आणि कार्यकर्त्यांना विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या या साऱ्याच्या विरोधात पथनाटिकांद्वारे आवाज उठवला जात आहे.

Exit mobile version